100+ Romantic Marathi Quotes For Lovers+ status :: प्रेमाचे स्टेटस

Romantic Marathi Quotes For Lovers

100+ Romantic Marathi Quotes For Lovers+ status :: प्रेमाचे स्टेटस

प्रेम ही भावनाआपल्या जीवनातील सर्वात सुंदर आणि महत्त्वाची भावना आहे.आपल्या प्रिय व्यक्तीला आपल्या मनातील प्रेम व्यक्त करण्यासाठी आपल्या website वर खास मराठी प्रेम कोट्स उपलब्ध आहेत हे कोट्स आपल्या भावना शब्दात व्यक्त करण्यासाठी आणि आपल्या नात्यात एक नवीन उर्जा आणण्यासाठी मदत करतील.

मराठी प्रेम कोट्स मध्ये आपल्या प्रेमाच्या गोड आणि हळव्या भावनांचे वर्णन आहे आपल्या प्रिय व्यक्तीला हे कोट्स पाठवून आपण आपल्या प्रेमाची उब आणि गोडवा व्यक्त करू शकता. सोशल मीडिया प्लेटफॉर्मवर आपल्या मित्रपरिवार आणि कुटुंबीयांनाही संदेश शेअर करून आपल्या प्रेमाचे अनुभूती त्यांनाही द्या🫶🏻🙏

मला आवडलेली सर्वात सुंदर परी म्हणजे तू
जगांत भारी नाही
पण माझं जग भारी करणारी आहेस तू ☺️😇

तू माझे हृदय चोरले आहेस,
पण मी तुला ते कायमचे ठेवू देईन.💑

कितीही रुसलीस कितीही रागावलीस
तरी
माझं तुझ्यावरच प्रेम कधीच कमी होणार नाही.”🤗😚

प्रेम म्हणजे गवताचं एक नाजूक पातं असतं,
हृदयाला हृदयाशी जोडणारं एक पवित्र नातं असतं!☺️😇

 Romantic Marathi Quotes For Lovers

“प्रेयसी लोकल सारखी असावी
नेहमी लेट येणारी
पण तिच्याशिवाय oPtiOn नसणारी.”💑

शब्दांत नाही सांगता येणार डोळ्यांतुन समजुन घेशील ना?
अस्वस्थ होइन मी जेव्हा धीर मला देशील ना?💞❣

“तीच नकळत चोरून बघणं पण
मनाला ‘एकदम वेड’ लावून जात
यार….मनात प्रेमाचा बीज रुजवून जातं”..☺️😇

मन गुंतायला वेळ लागत नाही,
मन तुटायलाही वेळ लागत नाही,
वेळ लागतो तो गुंतलेल्या मनाला आवरायला,
आणी तुटलेल्या मनाला सावरायला.💞❣

100+ Romantic Marathi Quotes For Lovers+ status :: प्रेमाचे स्टेटस

“तुझा हात हातात घेऊन,
तुझ्या खांद्यावर डोके ठेवून
शांत बसावं.”☺️😇

मनापासून प्रेम करणारा
कधीच वेडा नसतो कारण ते
वेड समजुन घेण्यासाठी कधीतरी
मनापासून प्रेम करावं लागतं.🤗😚

“माझ्या आयुष्याची पतंग खूप उंचावर उडेल
जेव्हा ‘माझं पिल्लू’
माझी फिरकी पकडायला
‘माझ्या बरोबर’ उभी असेल”.💑

प्रेमात कधीतरी टाईमपास करावा,
पण टाईमपास म्हणून कधीच प्रेम करू नये.

“तुझ्यासाठी जीव देणारे तुला खूप भेटतील
पण माझ्या सारखा जीव लावणारा
एक पण नाही मिळणार.”

 Romantic Marathi Quotes For Lovers

तू मला दिसलीस की मनात माझ्या धडधडतं,
थोडी लाजून हसलीस की बजेट माझं गडगडतं.☺️😇

“तु आहे म्हणून तर,
सगळं काही माझं आज आहे.”
“हे जग जरी नसलं तरी,
तुच माझ्या प्रेमाचा ताज आहे.”🤗😚

तू मिळाल्यावर सुध्दा परमेश्वराचा राग आला
सुंदर दान पदरात टाकायला त्याने किती उशीर केला.

नकटे जीवनात आई वडिलानंतर
कोणावर येवढ जीवापाड प्रेम केल नव्हत
तेवढ़ मि फक्त तुझ्यावर केलं आहे..💞❣

एक क्षण लागतो कुणाला तरी हसविण्यासाठी,
एक क्षण लागतो कुणाला तरी रडविण्यासाठी,
पण एक नजर लागते कुणावर तरी प्रेम करण्यासाठी.☺️😇

 Romantic Marathi Quotes For Lovers

Dear आकाशातील चांदण्या
पण माज्याकडे रागाने बगतायत अण
मला विचारतायत आमच्यातली
एक चांदणी तूज्याकडे कशी..💑

नको देवूस आता दुरावा,
तिरक्या नजरेने असे नको पाहूस तु.
सत्यात अवतर ग आता,
स्वप्नात नको छळूस तु.☺️😇

प्रेम करायचं म्हणाल तर,
कुणाशीही जमत नाही.
मनासारख्या जोडीदारा शिवाय,
संसारात मन रमत नाही.🤗😚

ह्रदय तर चोरलेस,
मन ही तुझ्यात गुंतवलेस तु.
येऊनी आयुष्यात माझ्या,
मजला आपलेसे केलेस तु.💑

 Romantic Marathi Quotes For Lovers

तुच माझी रूपमती,
सर्व मैत्रिणीत
तुच सौंदर्यवती,
म्हणून केली मी
तुझ्यावर प्रीती,
कधी बनशील तु
माझी सौभाग्यवती ..
ये वेडे शोनू हे बघ,
असे काय केलेस तु.
एका समजुतदाराला,
तुझे वेड लावलेस तु.☺️😇

तो चंद्र नकोय गं मला,
फक्त तुझी शीतल सावली दे..
हे जग नकोय गं मला,
फक्त तुझ्यातलं माझं जग दे..
स्वप्नं माझी खूप नाहीत गं मोठी,
पण तुझ्या स्वप्नात थोडी जागा दे..💞❣

आठवणीत नाही
सोबत तुझ्या राहायचंय
पाहिलं नाही
शेवटचं प्रेम तुझं व्हायचंय.🤗😚

त्या वेडीनी प्रपोज़ पण असा केला की,
मी तिला नाही म्हणूच शकलो नाही..
मला म्हटली चल टॉस करूया,
छापा पडला तर तु माझा आणि
काटा पडला तर मी तुझी.

 Romantic Marathi Quotes For Lovers

दिवस कसा हि जाऊ दे,
पण रात्री तिच्या सोबत जरासं
बोललं तरी रिलॅक्स वाटतं.☺️😇

तुझ्या चेहर्‍यावरचा राग
तुझ्यासारखाच गोड आहे..
म्हणूनच माझ्या मनाची
तुझ्याकडे ओढ आहे..
तुझ्या अबोलपणाचं कारण
माझ्यावरचा राग आहे..
मग मीही अबोलाच राहतो
तसं राहणं मला भाग आहे💑

तुझ्यासोबत घालवलेला
प्रत्येक क्षण एखाद्या
सुंदर स्वप्नासारखा आहे💞❣

वेडया मनाला माझ्या,
तुझ्याशिवाय आता काही सुचतच नाही..
तू, तू अन फक्त तूच,
तुझ्याशिवाय दुसरे काही दिसतच नाही..
अबोल हि प्रीत माझी,
तुला का कधीच कळत नाही..
अन वेडे हे मन माझे,
तुला पाहिल्याशिवाय काही राहवतच नाही.🤗😚

 Romantic Marathi Quotes For Lovers

प्रेम करणे म्हणजे
एकमेकांकडे पाहणे नव्हे
तर एकत्र एकाच दिशेने पाहणे.💑

कधी इतकं प्रेम झालं काही कळलंच नाही,
कधी इतकं वेड लावलं काही कळलंच नाही,
पहिल्यांदा कधी आवडलीस हे खरंच आठवत नाही,
पण आठवण काढल्याशिवाय आता खरंच राहवत नाही💞❣

ज्या व्यक्तीला आपण आपले समजून जीव लावतो,
ती आपल्या भावनांची कधीच कदर करत नाही,
आणि जी आपल्याला अगदी नकोशी असते
तीच आपल्यावर जीव टाकत असते.☺️😇

तिला वाटत असेल एवढा कसा बदलोय मी
अग वेडे तुटलेल्या फुलाचा रंग बदलणारंच ना..

आठवणी विसरता येतात,
पण प्रेम विसरता येत नाही.
आयुष्याच्या वाटेवर एकटे वाटले तर,
हात माझा धरशील ना?
सगळे खोटे ठरवतील मला तेव्हा,
विश्वास माझ्यावर ठेवशील ना?💑

 Romantic Marathi Quotes For Lovers

“फसवून प्रेम कर,
पण प्रेम करून फसवू नकोस,
विचार करून प्रेम कर,
पण प्रेम करून विचार करू नकोस,
हृदय तोडून प्रेम कर,
पण प्रेम करून हृदय तोडू नकोस☺️😇

“हो”म्हणशील
तर स्वीकार करेन. . . .
“नाही”म्हणशील
तर मेहनत करेन. . . . .
जेव्हा तुझ्या साठी
लायक होईल. . .
पुन्हा एकदा तुलाच 🌹प्रपोस करेन. . .
पण
आयुष्यभर ❤प्रेम मात्र तुझ्याशीच
करेन..💑

‎तू‬ भेटल्यापासून
‪देव‬ पण ‪नाराज‬ झालाय ‪‎माझ्यावर‬
बोलतो की
‪तू‬ आता काहीच ‪‎मागत‬ नाहीस.☺️😇

ह्रदयावर डोकं ठेव ,
बघ काय ऐकू येतं का…
ह्रदयाच्या प्रत्येक ठोक्यात,
नाव तुझंच येतं का ?.🤗😚

 Romantic Marathi Quotes For Lovers

ह्रदय ही हल्ल माझं
तुझ्याशिवाय काहीच मागत नाही…
तू सोबत असताना माझे ह्रदय,
माझे राहत नाही💞❣

ह्रदय फ़क्त तडफडतय ना ,
फुटले तर नाही ?
आयुष्याचे रंग ,
विटले तर नाही ☺️😇

Sweet love quotes for gf

हे सांगू की ते सांगू करत
तेच तर सांगायाच राहीले
तिचे ते मुके शब्द मी
माझ्या मुकया डोळ्यांनीच पाहिले

हे प्रेमाचं असचं असतं..
थोडसं अवघड अन थोडं सोप असतं..
पण एकदा जमायला लागलं की
ते आपोआपच घडत असतं..💑

 Romantic Marathi Quotes For Lovers

हे आपलं अबोल प्रेम
असचं सुंदर असु दे
पण स्वप्नात का होईना
एकदा तरी खुलू दे☺️😇

हृदयासारख सोप्प नाही काही या जगात तोडायला
मनाला गरज नसते पंखांची स्वप्नांच्या आकाशी ऊडायला🤗😚

हृदयाच्या रम्य मंदिरात,
प्रेमाच्या सुंदर वेलीवर
भावनांच्या सदैव जलाने,
सिँचन करणारे पहिले
फुल म्हनजे प्रेम होय💞❣

हृदय काहितरी सांगतय तुला,
वाट पाहते आहेस तु कोणाचितरी……
का लपवतेस भावना तुझ्या मनात,
हो कोनाच्यातरी मनाची रानी.🤗😚

100+ Romantic Marathi Quotes For Lovers+ status :: प्रेमाचे स्टेटस

हातात हात घेशील जेव्हा
भिती तुला कशाचीच नसेल…
अंधारातला काजवाही तेव्हा
सुर्यापेक्षा प्रखर असेल☺️😇

हातात हात घेता तुझा,
हृदयात कंप उठले..
हळूच मन माझे
तुझ्यात गुरफटले….

हातात पेन घेतले आणि तुझ्यावर
काही लिहूयात म्हंटले….
चारोळीत लिहायला घेतले पण,
चार पानांतही कमी पडले….

हात हजार मिळतात
अश्रू पुसण्यासाठी
डोळे दोनही मिळत नाहीत
सोबत रडण्यासाठी☺️😇

100+ Romantic Marathi Quotes For Lovers+ status :: प्रेमाचे स्टेटस

हात तुझा हातातुन
धुंद ही हवा,
रोजचाच चंद्र आज
भासतो नवा🤗😚

हा स्पर्श तुझा
हा स्पर्श तुझ्या प्रेमाचा,
हा स्पर्श
तुझ्या माझ्या भेटीचा.💑

हा नशिबाचा खेळ कोणता
कधी कुणाला ना कळला
कुणा मिळती सुलटे फासे
कधी डाव कुणाचा ना जुळला☺️😇

हा ओघ आहे कवितातल्या शब्दांचा
या मनातून त्या मनात पोहोचणारा
एखाद्याच्या मनाला सहजच रुचणारा
तर एखाद्याला हॄदयात खोलवर टोचणारा

100+ Romantic Marathi Quotes For Lovers+ status :: प्रेमाचे स्टेटस

हळूच माझ्या ह्रदयाला
कोणीतरी चोरून नेलंय….
स्वतःच ह्रदय मात्र
माझ्याकडे ठेवून गेलंय.🤗😚

हल्ली हल्ली मला
तुझी स्वप्ने पडतात,
स्वप्नातून तू जाताच
मला झोपेतून जागं करतात.💞❣

हल्ली मला भावनांचा
थांगच लागत नाही ,
क्षणभरही मनाला आता
उसंत मिळत नाही .

हलकेच येवून कानात ,
तुला सांगायचंय काही…
मिठीत तुझ्या येऊन ,
थोडं रहायचंय राणी.☺️😇

Romantic Marathi Quotes For Lovers

हजार वेळा तुला पहावे
असेच काही तुझ्यात आहे
मिटुन ङोळे पुन्हा बघावे
असेच काही तुझ्यात आहे🤗😚

स्वप्नातील साज घेऊन ती आली
ना सांगताच ती या मनाची झळी
हृदय आता तिच्या शिवाय
धडकेना,
का माझिया प्रियाला प्रीत कळेना काळे ना💑

स्वप्न मलाही पडतात, पण
त्यांच्या मागे मी धावत नाही
माझ्या आठ बाय दहाच्या खोलित
राजवाड्याचा दरवाजा मावत नाही💞❣

स्वतःचं मन मारून
तुला बरं जगता आलं
आपल्यांशी देखील तुला
परक्यासारखं वागता आलं🤗😚

Romantic Marathi Quotes For Lovers

स्पर्श तो तुझा
हवा हवासा
श्वासातून भासे
नवा नावासा..☺️😇

स्पर्श तुझा होता होताच,
मन माझे खुलून गेले..
अशी सामावून जा कुशीत माझ्या,
जसे जग हे सारे
आपल्यात सामावून गेले….

स्पर्श तुझा व्हावा,
अन देह हा माझा लाजून चूर व्हावा…
हक्काने मिठीत तू घ्यावेस,
जसा पाण्यावरी स्पर्श चांदण्याचा असावा…

सुखासाठी कधी हसावं लागंत ,
तर कधी रडावं लागतं,
कारण सुंदर धबधबा बनायला
पाण्यालाही उंचावरुन पडावं लागतं

 Romantic Marathi Quotes For Lovers

सुख हे फुलपाखरा सारखे असते ,
पाठलाग केला तर उडुण जात ,
बळजबरी केली तर मरुण जात ,
निरपक्षःपणे काम करत राहील तर ,
अलगद येउन मनगटा वर येउन बसत🤗😚

सुख दुखाचा विचार करताना
मी तुलाच समोर पाहिले..
माझे संपूर्ण जीवनच
तुझ्या माझ्या प्रेमाच्या नावे वाहीले.💑

सावली नकोस शोधु ,
ती आपल्या जवळच असते,
नजर फक्त मागे वळव,
डोळ्यांच्या कडेला ती हळुच दिसते,☺️😇

सागरची प्रत्येक लाट
माझ्या ओळखिची होति
कारण ती त्याच्या येवढिच
माझीही होती💞❣

love status for whatsapp status

प्रेमाचे स्टेटस

साकारलेल्या त्या भावनांना का आज शब्दच नाहीत ?
का त्या डोळ्यांमध्ये माझी एक ओळखही नाही

सांग सख्या , मी गेल्यावर
तुज माझी आठवण येईल का?
जाता जाता माझ्यासाठी तु,
दोन अश्रु गाळशील का?💞❣

सहवासाच्या वेलीवर प्रीतीचे फुल
केव्हा उमलल कळलच नाही,
तु माझी, तु माझी म्हणताना,
मी तुझा केव्हा झालो कळलचं नाही🤗😚

सहवासाची संगत तू
चांदण्यांची गंमत तू ,
रवी किरणांचा तुच तजेला
जलधारंची गंमत तू..

प्रेमाचे स्टेटस

सवय लागलीय तुझ्यावर प्रेम
करायची सुटता सुटेना,
शेवटी ठरवले विसरून जायचं तुला,
पण तुझ्यावाचून जगणं ही जमेना☺️😇

सर्वांपासून दूर एक
वेगळीच दुनिया आहे…
जिथे फ़क्त
तू आणि मी आहे💞❣

सर्वच गोष्टी सांगायच्या नसतात,
ज्या गोष्टी न सांगता समजतात
त्याला वेडं प्रेम म्हणतात.

सये रोज नव्याने दरवळतो
तुझ्या आठवणीचा सुगंध
मग उगाचच जडतो जीवाला
तुला आठवायचा वेडा छंद💑

प्रेमाचे स्टेटस

सये मन माझं भरकटतं असे,
रंगबेरंगी फुलपाखरासारखं…
अन् शोधत प्रत्येक फुलात,
प्रितीचा गंध तुझ्यासारखं🤗😚

समुद्रकाठी बसणारे लोकं
सर्व वेडे असतात मात्र खरे
प्रेम करणारे लोकं फ़ार थोडे असतात

समक्ष तर एक शब्दही बोलत नाहीस,
मग स्वप्नात कशी येतेस
मनमोकळ्या गप्पा मारायला☺️😇

समईला साथ आहे जोतीची,
अंधाराला साथ असते प्रकाशाची,
चंद्राला साथ असते चांदण्याची,
प्रेमाला साथ असते फ़क्त दोघांची.

प्रेमाचे स्टेटस

सगळ्यात अनोळखी कोण आहे ?
तर मी आहे माझ्यासाठी
अन सगळ्यात जवळचा कोण आहे
तर मी आहे तुझ्यासाठी💞❣

सगळ्यांपेक्षा वेगळी आणि सुदंर
तु नक्किच आहे….
पण त्यापेक्षाही सुदंर
तुझं माझ्या आयुष्यात असणं आहे.🤗😚

सख्या रे काय सांगु तुला
जीव माझाच मजवरी उधार झाला
या वेड्या सखीने तर तो ही
मजपासुनी दुर नेला.💑

सखे तू अशी नेहमी
वेड लावून का जातेस
डोळे मिटले कि तू
स्वप्नात येऊन जातेस.☺️😇

प्रेमाचे स्टेटस

सखे कशी विसरशील तू
आठवणी तुझ्यात माझ्या गुम्फलेल्या,
पारम्ब्यांच्या झुल्यावर
माझ्यासोबत झुललेल्या…..

संशय मनात रुतून बसतो
तोच खरा घातक असतो
या संशयालालवकर दुर कर आणि
प्रेम वेड्या…….च्या ह्रदयात
उभार प्रेमाचं घर.💞❣

संध्याकाळ मावळून गेली
सुर्यास्त झाल्यावर
आणि काळोख मात्र नटून
बसला चांदण आल्यावर.🤗😚

संगीत जुनचं आहे
सूर नव्याने जुळतायत…
मनही काहिसं जुनचं
तेही नवी तार छेडतायत…

शुन्यच आहे आयुष्य माझे
उणे तु असताना
धरलास का हात सांग तु
सोडुनच जायचे असताना💑

प्रेमाचे स्टेटस

शांत असा मी कधीच नव्हतो..
प्रत्येक क्षणात तुलाच पहात होतो..!!
असता जवळी तू, कधी हताश नव्हतो..
नसता तू एक क्षणभर जरी निराश का होतो..?

शब्दातून दुःख व्यक्त करता आले असते तर,
अश्रूंची गरज भासलीचं नसती..
सर्व काही शब्दांत सांगता आले असते तर,
भावनाची किंमतचं उरली नसती🤗😚

शब्द सागरात उडी मारून
मी शब्द शोधात आहे,
माझं प्रेम व्यक्त करण्या साठी
मी ह्या चारोळी लिहितो आहे.☺️😇

वेळीच आवरायला हवं होतं,
काळजाला या माझ्या …
सोसवत नाही आता,
तुझा जरासाही दुरावा …

वेड्या मित्राची प्रीत कधी
कळलीच नाही तुला तुझ्या
प्रीतीची छाया कधी
मिळालीच नाही मला.

वेड्या क्षणी भास् होतो
तू जवळ असल्याचा
डोळे उगीच दावा करतात
तू स्पष्ट दिसल्याचा

वेडी☺️😇तुला#Mekeupकरायची काही गरज नाही तु एक#Smile दिली ना तरी तु#Cute दिसतेस.

Romantic Marathi Quotes For Lovers

वेड लावते मला..
हसून लाजणे तुझे……
गालावरच्या खळीतले …
ते गोड हसणे तुझे.💞❣

विरहातही प्रेम असत
प्रेमात सगळ माफ असत
सजा देणारे तुम्ही आम्ही कोण
प्रेमच प्रेमाची परीक्षा पाहत असत🤗😚

वाळूवरच तुझ नाव लाटांनी येऊन पुसल
माझ्या मनावरच त्यांना कस पुसता येईल
अश्रुंच्या थेंबानी जे लिहील आहे
ते सहज कस कोणाला वाचता येईल

वाटलं होतं होकार देशील म्हणून मी तुला प्रफोज केलं पण जेव्हा तू नकार दिलास तेव्हा मात्र माझं काळीज फाटलं होतं

वाटल नव्हतं कधी
असही कधी घडेल…..
एक गोड सोनपरी
माझ्या प्रेमात पडेल.💑

वाटतं माझ्या हळव्या हद्यास,
कुणीतरी असावं प्रेम करणारं…
जणू सागराच्या पाण्यासारखं,
मला स्वतःत खोल सामावणारं….

वाट निमुळती होत जाते
तुझ्यामागून येताना
सोबत कोणाचीच उरत नाही
तुझ्या वाटेनी जाताना…🤗😚

लाटांचे प्रेम होते किना-यावर, पण तिचे लग्न झाले सागराबरोबर, किना-याची प्रिती तिला खेचत आणते. पण किना-याला डाग लागु नये म्हणुन ती परत जाते. हेच खर प्रेम.

लांब असूनही ‪#‎तिचाजवळअसल्याचा‬ भास होतो राव अन ‪#‎जवळअसतानातर
विचारूच नका☺️😇

लग्नानंतर तुझे नाव
बदलायचा बेत नाही..
कारण आता या नावाशिवाय
मला जगताच येत नाही💞❣

रोज फूल तोडत होतो
मी तुझ्या केसांसाठी
पण तू सुगंधही नाही ठेवलास
माझ्या सरत्या श्वासांसाठी

रेशमी अनुबंध हे अन
अबोल साऱ्या भावना…
शब्दांत त्या मांडू कशी
वेडया मना मज सांग ना.💑

रुसून बसने तिचे
मला खूप आवडते
काही न बोलता ओंजळीत टाकली फुले
की मिठीतच स्थिरावते

रात्रीची जागी राहून
मी त्या चांदनिला बघत होती
ती सुद्धा माझ्याप्रमाणे
एकटीच हसत होती.💞❣

रात्रं पटकन सरते
तुला उराशी धरून
मग दिवसभर तुला पहात राहते
मी परक्यासारखं दुरून🤗😚

रातराणीच्या फुलांनी
हि सांज बहरू दे,
तुझ्या आठवणींच्या सुगंधाने
माझे मन दरवळू दे.💑

रातराणी उमलावी तशी तु उमलतेस,
माझ्या मनात मनापासुन दरवळतेस..
खरं सांगु का ग तुला ?
तु मला मनापासुन खुप खुप आवडतेस..

रातराणी उमलावी तशी उमलतेस,
मनापासून दरावळतेस,
खरं सांगू का तुला मला तू खूप आवडतेस☺️😇

रात अशी ही तंद्रित
पापणिहि बघ लवते आहे
ह्रुदयाचे ठोके हळुवार सांगे
कुणीतरी माझ्यासाठी जागत आहे💞❣

येती भरून आकाशी
पावसाळी हे ढग
किती साहू रे मी सख्या
तुझ्या विरहाची धग.💞❣

येणारा दिवस कधीच
तुझ्या आठवणीशिवाय जात नाही
दिवस जरी गेला तरी
तुझी आठवण जात नाही.💑

Life Beautiful Quotes in marathi : जिवनबद्दल संदेश READ

येणा-या प्रत्येक सावळीत
तुझाच भास आहे,
तू येशील अशी उगीचच आस आहे.💞❣

ये सखे होकाराची
काय गरज आहे?,
माझ्या आयुष्यात
तुझीच कमी आहे☺️😇

Leave a Comment

2 sep : ह्या राशी ला परीक्षेच्या स्पर्धेत यश मिळेल (राशिभविष्य) 28 Aug : ह्या राशी ला सल्ला: वाहन चालवताना सतर्कता बाळगा, अपघाताची शक्यता. (राशिभविष्य) 25 Aug : आज ह्या राशी ला जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. (राशिभविष्य) 23 Aug : आज ह्या राशी ला नोकरीत यश मिळेल (राशिभविष्य) 21 Aug : आज कामाच्या ठिकाणी नवीन पद किंवा अधिकार मिळतील. (राशिभविष्य)